स्टार्ट अपसाठी असे जमा करा पैसे!

 स्टार्टअपसाठी असे जमा करा पैसे!

 तुमच्याकडे चांगल्या व्यवसाय संकल्पना असल्या तरीही त्यासाठी फंडिंग मिळविणे हे बरेच कठीण काम असते. कोणत्याही स्टार्टअपसाठी दोन प्रकारांनी निधी उभारला जाऊ शकतो.

START UP

 इन्फोग्राफिक्स

● भागभांडवल (इक्विटी) आणि डेट फंड

जेव्हा एखादा गुंतवणूकदार भागभांडवलात पैसे लावतो, तेव्हा त्याची प्रीसीड व सीड स्टेज असते. प्री-सीड ही प्रारंभिक अवस्था आहे. यात संकल्पनेला आकार मिळतो. प्रोटोटाईप तयार होते. यात गुंतवणूकही कमी असते. साधारणपणे स्टार्टअपचा संस्थापक भागीदार बनविण्याऐवजी स्वत:च पैसे लावणे पसंत करीत असतो. त्यासाठी तो एक तर बूट स्ट्रेपिंग करतो किंवा क्राऊड फंडिगच्या माध्यमातून निधी उभा करतो. फंडिगचे हे गणित समजून घेऊ या.


● बूट स्ट्रेपिंग

व्यवसाय चालविण्यासाठी स्वतःच्या पैशाचा वापर केला जातो, तेव्हा त्यास बूट स्ट्रेपिंग म्हटले जाते. व्यक्तिगत बचत, कमी अथवा विना व्याजाचे क्रेडिट कार्ड अथवा आपले घर तारण आणि क्रेडिट लाईन याद्वारे हा पैसा येतो.

@ सीड स्टेज

व्यवसाय पुढे वाढू लागतो, तेव्हा तो सीड स्टेजला येतो. या टप्प्यात उत्पादनाचे प्रोटोटाईप तयार होते. बाजारात मागणीची पडताळणी केली जाते. या टप्प्यात इन्क्युबेटर, एंजेल इन्व्हेस्टर (मित्र, नातेवाईक, सरकारी योजना, कर्ज वा क्राऊड फंडिंगचा वापर केला जातो.

मोठ्या निधीची गरज

व्यवसाय वाढल्यानंतर मोठ्या निधीची गरज भासते. यास सीरीज 'ए' फंडिग म्हणतात. या टप्प्यात व्हेंचर कॅपिटल फंड्स, व्हेंचर डेट फंड्स अथवा बँकांचे कर्ज यांचा वापर केला जातो. संकल्पना यशस्वी झाल्यानंतर फंडिंग बी, सी, डी आणि ई सिरीज मध्ये जाते. यापेक्षाही अधिक यशस्वी स्टार्टअप आयपीओच्या टप्प्यात जाते.

महिलांनी असा घ्यावा लाभ

स्टार्टअप फंडिगमध्ये महिलांसाठी विशेष वुमन ऑक्सलरेटर प्रोग्राम आहे. त्यात महिलांना अनुदान व वित्तीय साह्य केले जाते.

सरकार काय करतेय?

केंद्र सरकारने पुढील पाच-सहा वर्षासाठी जेनेसिस कार्यक्रमांतर्गत दहा हजारपेक्षा अधिक स्टार्टअप्सला इन्सेंटिव्ह देण्याची तयारी केली आहे. अधिकाधिक स्टार्टअप्सला आर्थिक पुरवठ्याची मोठी समस्या नाही. ते यासाठी विविध प्रयत्न करत आहेत, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अलकेश कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली. १६ जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो.

Comments

Popular posts from this blog

How do fish breathe in water ?

buy gold wisely

Video of girls of Chandigarh University taking bath goes viral