इंटिरिअरमध्ये फसवणूक झाली, पुढे काय?

इंटिरिअरमध्ये फसवणूक झाली, पुढे काय?

तर काय कराल?

इंटिरिअरमध्ये फसवणूक झाली, पुढे काय?

आम्ही पुण्याच्या फ्लॅटच्या इंटिरिअरसाठी नामांकित कंपनी निवडली. चर्चा झाली, काम ठरले. कोटेशनच्या ५% (अंदाजे ३०,०००) पेमेंट केले. कामात खूप घोळ झाले. त्यांनी निवडलेले फर्निचर बाजारभावापेक्षा महाग होते. कामाची गुणवत्ताही कबूल केल्याप्रमाणे नव्हती. आम्हाला अपूर्ण कामासह तिथे शिफ्ट व्हावे लागले. काय करता येऊ शकेल? - एक वाचक




तुम्ही पाठवलेल्या मेलमध्ये तुम्ही तुमची तक्रार अतिशय तपशीलवार दिली आहे, तो सगळा तपशील येथे देत नाही. पण तुमच्या बाजूने काय गफलती झाल्या, ते पाहू या. संबंधित कंपनीने खर्चाचा अंदाज दिल्यावर तुम्ही साधारण तीस हजारांचा अॅडव्हान्स दिला, जो परत मिळणार नाही हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेले होते. एका ठरावीक मुदतीत तुमच्या पसंतीचे डिझाइन त्यांनी तयार केले नाही तर जो विलंब होईल त्याला कोण जबाबदार असेल आणि त्या विलंबाबद्दल काही नुकसानभरपाई / क्षतीपूर्ती मिळणार आहे का हे ठरले होते का, हे समजू शकले नाही.

डिझाइन तयार झाल्यावर तुम्ही काही मुद्दे मांडले होते, मग तुमचे म्हणणे त्यांनी मान्य केले होते की नव्हते? की तुम्ही सांगितलेले वरवर मान्य करून प्रत्यक्षात वेगळेच झाले? त्यांनी निवडलेले फर्निचर महाग होते.

या काळात तुमची मते, तक्रारी, शंका तुम्ही डिझाइनर्सना लेखी कळवले होते का? साइटवर स्वतंत्र सूचनावही ठेवण्याची पद्धत आहे. यात होणाऱ्या नोंदी तीन

प्रतींमध्ये केल्या जातात.. एक प्रत तुमच्याकडे दुसरी त्यांच्या प्रतिनिधीकडे आणि तिसरी स्थळप्रत अशी ही व्यवस्था असते.

अशा प्रकारच्या काही व्यवस्था तुम्ही केल्या होत्या का? आता काम अर्धवट राहिले आहे आणि तुम्ही नाईलाज म्हणून नव्या जागेत शिफ्ट झालेले आहात. काम वेळेवर पूर्ण न झाल्याबद्दल काही नुकसानभरपाईची तरतूद करारात आहे का? तुमच्यात आणि डिझाइनर्समध्ये लेखी करार झाला होता का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

Comments

Popular posts from this blog

How do fish breathe in water ?

buy gold wisely

Video of girls of Chandigarh University taking bath goes viral